१,२०१ आजारांवर मोफत उपचार; 'आयुष्मान'चे ई- कार्ड काढले का?
मुंबई : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता राज्यांशी विचार करून आयुष्मान कार्ड जारी केले आहेत. या कार्डसच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा तर मिळणार आहेच, शिवाय राज्य सरकारांनीही अशी योजना राबवली आहे, तर त्याच कार्डमुळे लोकांना आरोग्याचा लाभही घेता येईल, यात जवळपास एक हजारांहून अधिक आजारांवर मोफत उपचारांची सोय आहे.
वैद्यकीय इतिहास डिजिटल होणार
डिजिटल ओळखपत्रदेखील आहे, यामध्ये वैद्यकीय रेकॉर्ड जतन केले जातील. म्हणजेच तुमची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री एकाच ठिकाणी डिजिटल पद्धतीने सेव्ह केली जाईल. वैद्यकीय इतिहास डिजिटल पद्धतीने जतन केला जाईल, जो गरजेवेळी उपयोगी पडेल.
आयुष्मान ई-कार्ड कोणाला काढता येणार?
रोय योजना अन मंत्री
PM-JAY
सर्वप्रथम आयुष्मान डिजिटल हेल्थ १ मिशनच्या वेबसाइटवर जा. आता हो पेजवर आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक म्हणजेच create Your ABHA Number या पर्यायावर क्लिक करा. ABHA क्रमांक तयार करण्यासाठी दोन पर्याय दिसतील, एक निवडा, आधार क्रमांक किंवा ड्रायव्हिंग लायसन्सवर क्लिक करा आणि पुढील पृष्ठावर त्याचा क्रमांक टाकून सबमिट करा.
नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो प्रविष्ट करून तुमचा ABHA कार्डचा अर्ज भरला जातो. अर्जात विचारलेली माहिती दिल्यानंतर ती सादर करावी. त्यानंतर तुमचा फोटो अपलोड करा. यासाठी माय अकाऊंटवर क्लिक करा. दिलेल्या पर्यायातून प्रोफाइल एडिटवर क्लिक करा आणि फोटो अपलोड करा. आता सबमिटवर क्लिक करा.
QWRT23456
कार्डचे महत्त्व
हे आरोग्य विमा कार्ड आहे. आयुष्मान कार्ड फक्त गरीबांसाठी आहे. उपचारावेळी आर्थिक मदत होते. या कार्डचे शहरी आणि ग्रामीण लोकांसाठी वेगवेगळे निकष आहेत. कोणताही भारतीय नागरिक ते बनवू शकतो. वैद्यकीय किया आरोग्य डाटा पाहण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी उपयुक्त आहे.
लाभ काय?
उपचारासाठी सर्वत्र रिपोर्ट घेऊन जाण्याची गरज नाही. सर्व वैद्यकीय नोंदी जसे की लॅब रिपोर्ट, प्रिस्क्रिप्शन आणि निदान दाखवू शकता. ऑनलाइन उपचार, टेलिमेडिसिन, खासगी डॉक्टर, ई- फार्मसी आणि वैयक्तिक आरोग्य नोंदी यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील.
कोणती कागदपत्रे आवश्यक :
लाभाथ्र्यांजवळ आधार कार्ड, रेशन
G आवश्यक आहेत. या कागदपत्रांवरून त्यास योजनेचा लाभ घेता येतो.
कार्ड ही दोनच कागदपत्रे रुग्णालयात मिळणार उपचार ?
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण १२ रुग्णालये आहेत. त्यात शासकीय आणि खासगी रूग्णालयांचा समावेश आहे. राज्यातील इतर समाविष्ट रुग्णालयातही उपचार घेता येऊ शकतो.